समुद्रकिनारी प्रसाधनगृहे उभारण्याची काँग्रेसची मागणी

भुईगाव येथील समुद्रकिनारी लाकडी बांबू, कापड यांच्या सहाय्याने नैसर्गिक विधीची सोय केल्याचे आढळून आले. सहज चौकशी केली असता समजले की, स्थानिक नागरिकांकडून हा आडोसा तयार केला आहे.
समुद्रकिनारी प्रसाधनगृहे उभारण्याची काँग्रेसची मागणी

वसई : पालघर जिल्ह्यात वसई येथील सुरुची बाग, तसेच भुईगाव, रानगाव, रजोडी, कळंब अर्नाळा, सातपाटी, केळवा, डहाणू, पालघर या ठिकाणी असलेले समुद्रकिनारी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. स्थानिकांप्रमाणे परदेशी पाहुणे सुद्धा सहकुटुंब भेट देऊन येथील वातावरणाचा आनंद घेतात. या स्थळांवर दिवसभराच्या वास्तव्यात नैसर्गिक विधीची गरज भासते. पुरुष पर्यटक आपला कार्यभाग आडोशाला जाऊन उरकतात, परंतु शौचालय-प्रसाधनगृह नसल्यामुळे महिला भगिनींची कुचंबना होते. म्हणून वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसतर्फे पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असलेल्या सर्व समुद्रकिनारी प्रसाधनगृहे उभारण्याची मागणी महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

भुईगाव येथील समुद्रकिनारी लाकडी बांबू, कापड यांच्या सहाय्याने नैसर्गिक विधीची सोय केल्याचे आढळून आले. सहज चौकशी केली असता समजले की, स्थानिक नागरिकांकडून हा आडोसा तयार केला आहे. ही तात्पुरती सोय परिपूर्ण नसल्याने प्रदूषण होऊन रोगराईला आमंत्रण मिळते. सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते त्यामुळे त्यांची शौचालय प्रसाधनगृहांची सोय होणे अत्यंत गरजेचे असल्याचे निदर्शनास आल्याने वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्प बांधणीकडे सरकारने लक्ष देण्यापेक्षा पालघर जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी कायम स्वरूपी शौचालय प्रसाधनगृहे उभारून महिला, पुरुषांसह सर्व पर्यटकांची सोय करण्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in