तांत्रिक बिघाडाने जिन्यात वीजप्रवाह उतरून युवकाचा मृत्यू

तक्रार निवारण क्रमांकावर अपघाताची माहिती मिळताच गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन कर्मचारी राधेश्यामनगर येथील घटनास्थळी पोहचले.
तांत्रिक बिघाडाने जिन्यात वीजप्रवाह उतरून युवकाचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे : महावितरणच्या उल्हासनगर चार उपविभागातील राधेश्यामनगर भागात सुजल घडपकर याचा अंघोळ करताना विजेचा धक्का बसून गुरुवारी मृत्यू झाला. घरातील संचमांडणीतील तांत्रिक चुकीमुळे जिन्यात वीजप्रवाह उतरल्याने त्याला स्पर्श झाल्याने सदर युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

तक्रार निवारण क्रमांकावर अपघाताची माहिती मिळताच गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन कर्मचारी राधेश्यामनगर येथील घटनास्थळी पोहचले. प्राथमिक तपासणीत घरातील पंखा सुरू केल्यानंतर लोखंडी जिन्यात वीजप्रवाह‍ उतरत असल्याचे आढळून आले. सखोल तपासणीत सदोष वायरिंगमुळे हा अपघात घडल्याचे समोर आले. विद्युत निरीक्षकांच्या समक्ष प्रात्यक्षिकाद्वारे वस्तुस्थिती समोर मांडण्यात आली. घरातील तांत्रिक बिघाड व विद्युत सुरक्षेसाठी आवश्यक काळजी न घेतल्याने हा प्राणांतिक अपघात घडल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in