रक्षाबंधन सणामुळे मार्केटमध्ये उत्साह पण यंदा राख्या महागल्या

रेडिमेड दुकानातून किंवा ऑनलाईन खरेदी करुन मार्केटमध्ये मंदी असली तरी रक्षाबंधन सणामुळे मार्केटमध्ये उत्साह आला
रक्षाबंधन सणामुळे मार्केटमध्ये उत्साह पण यंदा राख्या महागल्या

गेली काही वर्षे राख्या बनविण्याचा घरगुती उद्योग आता आदिवासी भागात जाऊन पोहचला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशवसृष्टी या संस्थेने स्थानिक महिलांना रोजगार मिळावा म्हणून बांबुच्या वस्तू बनवितानाच राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. येथे हजारो राखो बनविल्या जातात. अलिकडे राख्या बनविण्यात विरारमधील काही उद्योजक तेथे जाणीवपूर्वक पर्यावरण पूरक कामातून आदिवासींना रोजगार मिळवून देण्याचे तंत्र अवगत केले आहे. येथे हजारो बनविल्या जातात. मात्र यंदा राख्या महाग झाल्या आहेत.

रक्षाबंधन या सणाच्या दिवशी रेडिमेड दुकानातून किंवा ऑनलाईन खरेदी करुन मार्केटमध्ये मंदी असली तरी रक्षाबंधन सणामुळे मार्केटमध्ये उत्साह आला आहे. विविध भेटवस्तू व राख्यांमुळे बाजार गजबजले आहेत. राख्या साध्या किंवा कल्पकतेने बनविलेल्या आकर्षक असल्या तरी दरवर्षीपेक्षा राखी बनविण्यासाठी लागणाऱ्या सुट्या वस्तू महाग झाल्यामुळे यंदा दहा रुपयांना मिळणारी राखी पंधरा रुपये किंमतीची झाली आहे. म्हणजे राख्यांचा भाव पन्नास टक्क्यांनी वाढलेला आहे. ऑनलाईन बाजारातून मिळणाऱ्या या राख्यांची किंमत कमीत कमी ७०/- रुपयांपासून सुरु झाली आहे. घाऊक राख्या खरेदी केल्या तर दहा ते पंधरा टक्के सवलत दिली जाते. राख्या भेटवस्तू म्हणून गिफ्ट पॅकेटमधून दिल्या जातात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in