
कल्याण/ भांडुप : महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडळात वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मार्च महिन्यात आत्तापर्यंत या दोन्ही परिमंडळातील १० हजार १७७ थकबाकीदार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. मार्च अखेरला अवघे दिवस उरले असताना कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिले तत्काळ भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग देण्यात आला आहे. कल्याण परिमंडळात मार्चमध्ये आत्तापर्यंत ५ हजार ५६४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात कल्याण मंडळ एक अंतर्गत १ हजार २५२, कल्याण मंडळ दोन अंतर्गत १ हजार ७००, वसई मंडळात २ हजार ४०२ आणि पालघर मंडळात २१० ग्राहकांचा समावेश आहे. मार्च अखेरपर्यंत कल्याण परिमंडळातील विविध वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांकडून ५३ कोटी ४ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल होणे अजून बाकी आहे.
भांडुप परिमंडळात मार्चमध्ये आत्तापर्यंत ४ हजार ६१३ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात ठाणे शहर मंडळ अंतर्गत १ हजार २९८, वाशी मंडळ अंतर्गत १ हजार ७७९, आणि पेण मंडळात १ हजार ५३६ ग्राहकांचा समावेश आहे. ३१ मार्चपर्यंत भांडुप परिमंडळातील विविध वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांकडून ७५ कोटी ९६ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी देणाऱ्या अभय योजनेला आता केवळ पाच दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला या योजनेची मुदत संपत आहे. दोन्ही परिमंडळामध्ये आतापर्यंत १६ हजार ५०० ग्राहकांनी जवळपास ३५ कोटी ५० लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळवली आहे. उर्वरित थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी देणाऱ्या अभय योजनेला आता केवळ पाच दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला या योजनेची मुदत संपत आहे. दोन्ही परिमंडळामध्ये आतापर्यंत १६ हजार ५०० ग्राहकांनी जवळपास ३५ कोटी ५० लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळवली आहे. उर्वरित थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कोल्हापूर परिमंडळात ३४ कोटी ५९ लाखांची थकबाकी; ९ हजार ४५८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ७१ हजार २८१ ग्राहकांकडे ३४ कोटी ५९ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. तर गेल्या तीन महिन्यांत परिमंडळ अंतर्गत ३ हजार ५३७ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि.२९), रविवारी (दि.३०) व सोमवार (दि.३१) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.