Kalyan : दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान उत्सव; पाच लाख भाविकांच्या व्यवस्थेचे नियोजन

किल्ले दुर्गाडी येथे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्रोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी मंगळवारी किल्ले दुर्गाडी येथे देवस्थान नवरात्रोत्सव समिती तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
Kalyan : दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान उत्सव; पाच लाख भाविकांच्या व्यवस्थेचे नियोजन
Kalyan : दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान उत्सव; पाच लाख भाविकांच्या व्यवस्थेचे नियोजनसंग्रहित छायाचित्र : X|@RaviDadaChavan
Published on: 

शंकर जाधव/कल्याण

किल्ले दुर्गाडी येथे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्रोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी मंगळवारी किल्ले दुर्गाडी येथे देवस्थान नवरात्रोत्सव समिती तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला किल्ले दुर्गाडी देवस्थान नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या काळात किल्ले दुर्गाडी येथे सुमारे पाच लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतूक नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन, वीज आणि पाणीपुरवठा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा तसेच किल्ला परिसरातील आवश्यक नागरी सुविधांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्सवाच्या काळात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.

यावेळी किल्ले दुर्गाडी येथे गेल्या सुमारे ५० ते ५५ वर्षांपासून नवरात्रोत्सवाची परंपरा सुरू असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बंदी हुकूम मोडल्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाल्याचे समितीच्या वतीने नमूद करण्यात आले. नवरात्रोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात आणि भाविकांना सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in