पेण तालुक्यातील पिडीत महिलेचा उपचारादरम्यान जे. जे. रुग्णालय दुर्दैवी मृत्यू

विवाहित महिलेचा तिच्या इच्छेविरुद्ध १६ महिन्यांचा गर्भनष्ट केल्याची घटना घडली होती
पेण तालुक्यातील पिडीत महिलेचा उपचारादरम्यान  जे. जे. रुग्णालय दुर्दैवी मृत्यू

पेण तालुक्यातील जोहे गावांमधील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात वरेडी येथील एका विवाहित महिलेचा तिच्या इच्छेविरुद्ध १६ महिन्यांचा गर्भनष्ट केल्याची घटना घडली होती. सदर महिलेची तब्येत गंभीर झाल्याने तिला अधिक उपचारार्थ जे. जे. रुग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले होते.

या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने हमरापूर विभागातील ग्रामस्थांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी डॉ. धुमाळसह इतर आरोपींची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

पेण तालुक्यातील वरेडी येथे राहणारी महिला गर्भवती राहिली होती. सदरचा गर्भ १६ आठवड्याचा झाल्यानंतर सासरच्या मंडळींना साथ देत डॉ. शेखर धुमाळ यांनी गर्भ नष्ट केला. त्यामुळे सदर पीडित महिलेच्या शरीरावर विपरीत परिणाम होउन शरीरांतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याने सदर महिलेला तातडीने जे. जे. रुग्णालय मुंबई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी दादर सागरी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्या मुलीची व तिच्या निष्पाप बालकाचा खून करणाऱ्यांवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत महिलेचे वडील चंदर शंकर कोळी यांनी केली आहे.

माझ्या मुलीचा व तिच्या निष्पाप बालकाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. माझ्या मुलीच्या सासरवाडीच्या मंडळींनी व डॉ. शेखर धुमाळ यांनी संगणमत करून माझ्या मुलीची व निष्पाप बालकाची हत्या केली आहे. त्यांच्यावर भा. द. वि कलम ३०२ नुसार दोन जणांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत महिलेचे वडील चंदर शंकर कोळी राहणार वरेडी यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in