मुंब्र्यात भल्या पहाटे आगडोंब; १५ दुचाकींसह लाकडी वखार, ३ गाळे, ४ झोपड्या खाक

आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नसले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला
मुंब्र्यात भल्या पहाटे आगडोंब; १५ दुचाकींसह लाकडी वखार, ३ गाळे, ४ झोपड्या खाक

ठाणे : मुंब्रा कौसा परिसरात शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत एक लाकडी वखार, तीन गाळे आणि १५ दुचाकी जाळून खाक झाल्या आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नसले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३ हायराईज फायर वाहन, १ वॉटर टँकर, १ रेस्क्यू वाहनासह,१ खाजगी जेसीबी मशीनच्या सहाय्याने एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

मुंब्रा- कौसा येथील लाकडी वखारीसह तीन गाळ्यांना शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने खळबळ उडाली. ही आग तब्बल एक तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविण्यात आली. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी लाकडी वखारीसह तीन गाळे आणि चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या १५ दुचाकींचा जागेवरच कोळसा झाला. याशिवाय तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या ४ झोपड्यांची राखरांगोळी झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in