रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम

सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीला महत्व देत, हीच काळाची गरज असल्याचे म्हटले आहे
रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम

जव्हार तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचे पहायला मिळत आहे, आधुनिक शेती,आधुनिक साहित्य, सुधारित बियाणांची वाण आणि रासायनिक खते यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावायला सुरुवात झाली आहे, हे जरी खरे असले तरी रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे.

तालुक्यात शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या नादात शेतकरी वर्गाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर तर स्विकारला, मात्र सोबतच रासायनिक खते, कीटकनाशक इत्यादींचाही वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, यामुळे दिवसेंदिवस जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होऊन मातीचा दर्जा खालावत आहे. जमीन दिवसेंदिवस कमी उत्पन्नाची होत असल्यामुळे याचा परिणाम आपोआपच शेतीच्या उत्पादनावर होत आहे. म्हणून आता पुन्हा सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीला महत्व देत, हीच काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.

पूर्वी शेती व्यवसायासोबत पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहत होते. पशुपालनात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पाळत होते व त्याचबरोबर दुग्धव्यवसायही जोमाने करत होते. पशुपालन करत असल्यामुळे जनावरांची विष्ठा मोठया प्रमाणात निर्माण होत होती आणि तीच विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे मिळत होती. यामुळे जमिनीचा दर्जा वाढत होता. कोणतीही हानी होत नव्हती शिवाय शेतक ऱ्यांना निरोगी पिकातून पौष्टिक अन्न मिळत होते. तसेच उत्पादन दर्जा व कसदार पिकांची वाढही होत होती. खरीप आणि रब्बी हंगामात पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तर शेतकरी स्वतः उपाययोजना करीत असे. कालांतराने आधुनिक शेतीच्या नावाखाली पारंपारिक शेती पद्धत बंद झाली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in