भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने 500 कुटुंबियांचा पाणीपुरवठा सुरळीत, नागरिकांनी मानले आभार

पावसाळ्यात घराच्या छतावरून खाली पडणारे पाणी भरण्याची वेळ येथील रहिवाश्यांवर आली होती
भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने 500 कुटुंबियांचा पाणीपुरवठा सुरळीत, नागरिकांनी मानले आभार

डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी मधील ५०० घरांचा गेल्या दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद होता. अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे येथील रहिवाश्यांनी तक्रार करूनही प्रशासनाकडे झोपडपट्टीवासीयांच्या समस्यांकडे कानाडोळा केला.अखेर 500 कुटुंबीयांनी भाजपकडे धाव घेतली. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर सचिव राजू शेख यांनी कुटुंबियांची व्यथा ऐकली. यासंदर्भात भाजपने डोंबिवली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. भाजपच्या प्रयत्नाने 500 कुटुंबियांचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी आभार मानले.

एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे नळाला पाणी नाही अशी अवस्था डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीवासीयांची झाली होती. पावसाळ्यात घराच्या छतावरून खाली पडणारे पाणी भरण्याची वेळ येथील रहिवाश्यांवर आली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in