अलिबाग-विरारसाठी एप्रिल महिन्यात कंत्राटदार मिळणार; मार्गिकेच्या कामासाठी आठ कंत्राटदारांच्या निविदा

निवडणूक रोख्यांमुळे चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीसह, एल अँड टी, अप्को, अफकॉन, पटेल इन्फ्रा, वेलस्पून इंटरप्रायजेस, मोन्टोकार्लो यासह अन्य एका कंपनीचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अलिबाग-विरारसाठी एप्रिल महिन्यात कंत्राटदार मिळणार; मार्गिकेच्या कामासाठी आठ कंत्राटदारांच्या निविदा

अलिबाग : बहुप्रतीक्षित अलिबाग-विरार बहुद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी आठ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. येत्या काही दिवसांत या कामासाठी निविदा अंतिम केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा मार्ग रायगडकरांसाठी विकासाच्या नवीन वाटा निर्माण करणार ठरणार असल्याचे बोलले जाते. निवडणूक रोख्यांमुळे चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीसह, एल अँड टी, अप्को, अफकॉन, पटेल इन्फ्रा, वेलस्पून इंटरप्रायजेस, मोन्टोकार्लो यासह अन्य एका कंपनीचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या प्रकल्पाच्या आर्थिक निविदा एप्रिल महिन्यात खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.

  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) अलिबाग-विरार दरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा बहुउद्देशीय वाहतुकीचा मार्ग निर्माण करण्यात येणार आहे.

  • मुंबई महानगरातील प्रवेश नियंत्रित असा हा पहिलाच महामार्ग असणार आहे.

  • या मार्गामधोमध १३६ कि.मी. लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे.

  • त्यातील पहिल्या टप्प्यात वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर ते पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान ९६ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारला जाईल.

  • या महामार्गासाठी यासाठी ६० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये भूसंपादनाच्या सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in