एकनाथ खडसे आज डोंबिवलीत येणार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे असून पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राम नेमाडे यांच्या हस्ते होणार आहे.
एकनाथ खडसे आज डोंबिवलीत येणार

आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली आयोजित लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित लेवा साहित्यिक रत्ने या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व लेवा साहित्यिकाचा सन्मान सोहळा रविवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ठाकूर हॉल, आयडीबीआय बँक जवळ, टंडन रोड रामनगर डोंबिवली पूर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे असून पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राम नेमाडे यांच्या हस्ते होणार आहे.

विशेष उपस्थिती म्हणून व्याकरणाचार्य शास्त्री भक्ती किशोरदास, यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी, प्रा. डॉ. गुणवंत भंगाळे , उद्योजक रत्नाकर चौधरी, उद्योजक राजेंद्र पाटील व डॉ.अनिकेत पाटील यांच्या उपस्थित राहणार आहे.

सदर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहेते, सचिव योगेश जोशी व उपाध्यक्ष सुनील खर्डीकर, लेखक ,संपादक खेमचंद पाटील परिश्रम घेत आहे. यामुळे एकनाथ खडसे डोंबिवलीत काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in