ठाण्याच्या भाजपाने फक्त उपमुख्यामंत्र्यांना दिल्या शुभेच्छा,बॅनर्सवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोला स्थान नाही

बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही नसल्याने ‘ठाण्याच्या भाजपला सत्तेत एकनाथ शिंदे रुचेनात’ अशी चर्चा सुरु झाली आहे.
ठाण्याच्या भाजपाने फक्त उपमुख्यामंत्र्यांना दिल्या शुभेच्छा,बॅनर्सवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोला स्थान नाही

राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या फुटीर गटाची सत्ता आली असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. नव्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठरावही बहुमताने पारित झाला आहे. दरम्यान, ठाण्यात भाजपकडून नव्या सरकरला शुभेच्छा देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी जे बॅनर्स लावण्यात आले आहेत, त्यावर फक्त फडणवीस यांनाच उपमुख्यामंत्रीपदाच्या शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही नसल्याने ‘ठाण्याच्या भाजपला सत्तेत एकनाथ शिंदे रुचेनात’ अशी चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात शिवसेनेचा एक गट आणि भाजप यांची सत्ता आली असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याचे मनोमिलन करण्यासाठी दोनी पक्षाच्या नेत्यांना बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

ठाणे जिल्हा हा पूर्वीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतू, शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या जिल्ह्यात चांगले संगठन बांधले आणि भाजपकडून ठाणे लोकसभेची हक्काची जागा शिवसेनेकडे खेचुन घेतली. त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या मतदासंघापैकी कल्याण लोकसभा हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा करत स्व:तकडे घेतला. तर, भाजपला भिवंडीला पाठवून दिले. त्यानंतर पालघर हा भाजपच्या हक्काचा मतदारसंघही यंदा शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेतला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनातली सल वाढली. दुसरीकडे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत हक्काच्या ठाण्यात भाजपने शिवसेनेला अस्मान दाखवले तेंव्हापासून शिवसेनेत मोठी नाराजी होती. दुसरीकडे २०१९ च्या विधानसभा निवडणुका शिवसेना भाजप युती करून लढले, मात्र या निवडणुकीत १८ पैकी ८ जागा जिंकून भाजपने जिंकून चांगली मुसंडी मारली तर २०१४ च्या तुलनेत शिवसेनेची एक जागा कमी झाली. युतीत एकत्र निवडणूक लढत असले तरी शिवसेना भाजपात कायम अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु होता. सध्या जिल्ह्यावर शिवसेना फुटीर गटाचे नेते आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व असले तरी भाजपकडूनही जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नियोजनबद्ध प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादीतुन आलेल्या कपिल पाटील याना भिवंडीची खासदारकी दोन वेळा देतानाच सध्या त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रिमंडळात पंचायत राज राज्य मंत्रिपद देण्यात आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईचे सम्राट गणेश नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता ज्या शिंदे यांच्या विरोधात गेल्या दोन वर्षांपासून लढावे लागले तेच शिंदे भाजपसोबत आले आणि मुख्यमंत्री झाले असले तरी, या राजकीय घडामोडी काही भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना रुचलेल्या दिसत नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in