पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात इलेक्ट्रिक बस धावणार

इलेक्ट्रिक बसमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
 पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात इलेक्ट्रिक बस धावणार

मिरा-भाईंदर महापालिका ३० मिडी आकाराच्या इलेक्टि्रक बस ठेकेदारा मार्फत खरेदी करणार आहे. तर शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी १ मिनी इलेक्टि्रक बस महापालिका थेट खरेदी करणार आहे. इलेक्टि्रक बसमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाकडून महापालिकेस राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमा अंतर्गत इलेक्टि्रक बस खरेदी साठी १४ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यातून ८० लाख रुपयांची मिनी इलेक्टि्रक बस ही महापालिका थेट खरेदी करणार आहे. ह्या बसचा वापर शहरातील पर्यटनस्थळ दर्शनसाठी केला जाणार आहे. आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी पर्यटन बस सुरु करण्याची संकल्पना जाहीर केली होती. त्या अनुषंगाने ही मिनीबस पर्यटनस्थळ दर्शनसाठी उपयोगात आणली जाणार आहे.

या शिवाय ३० इलेक्टि्रक बस खरेदी ही ठेकेदाराच्या माध्यमातून केली जाणार आहे. ह्या मिडी आकाराच्या बस खरेदीसाठी ठेकेदाराला १३ कोटी २० लाख दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रति बस सुमारे ४५ लाख रुपयांचे अनुदान पालिका देणार आहे.

जीसीसी तत्वावर ह्या ३० बस चालविल्या जाणार असून त्याचा देखभाल-दुरुस्ती , कर्मचारी पगार आदी सर्व खर्च ठेकेदारच करणार आहे. प्रति बस सुमारे ४५ लाख अनुदान सुरवातीलाच ठेकेदाराला पालिका देणार असून त्या शिवाय प्रति किलो मीटर प्रमाणे बस चालवण्याचा खर्च सुद्धा पालिका ठेकेदारास देणार आहे. ह्या ३१ बससाठी निविदा काढण्यास सोमवारी आयुक्त ढोले यांनी मंजुरी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in