ठाण्यातील सर्व मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाण्यातील सर्व मार्केटचे तातडीने इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाण्यातील सर्व मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
ठाण्यातील सर्व मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा(Photo-X/@mieknathshinde)
Published on

ठाणे : ठाण्यातील सर्व मार्केटचे तातडीने इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदे यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

ते म्हणाले की, या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळे धारकांचे मोठे नुकसान झाले आहे. अपरात्री आग लागल्याने त्यांना सामानही बाहेर काढता आले नाही. त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे खाक झाले. ठाणे मनपा आयुक्तांना हे मार्केट तातडीने स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिकचे काम पूर्ण करून येत्या १० दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी गाळे हस्तांतरित करावेत, असेही निर्देश दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे मनपातील शिवसेना गटनेते पवन कदम, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेवक मंदार कीणी, शिवसेनेचे ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती आणि शिवसेनेचे आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in