ठाण्यातील आरक्षित पार्किंगच्या जागेवर अतिक्रमणे; ३० आरक्षित भूखंडांपैकी २२ जागांवर केला अनधिकृत कब्जा

ठाणे शहराचे नागरिकरण झपाटयाने वाढत असल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे
ठाण्यातील आरक्षित पार्किंगच्या जागेवर अतिक्रमणे; ३० आरक्षित भूखंडांपैकी २२ जागांवर केला अनधिकृत कब्जा

ठाण्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पार्किंग तळाची आवश्यकता असताना मात्र शहरात अधिकृत पार्किंगचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शहराच्या विकास आराखड्यात जे ३० भूखंड पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत, त्यातील तब्बल २२ भूखंड अतिक्रमणाने बाधित असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ठाणे शहराचे नागरिकरण झपाटयाने वाढत असल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे. ठाणे स्टेशनकडे येणा-या वाहनधारकांची संख्या मोठया प्रमाणावर असून, दिवसेंदिवस पार्किग समस्या बिकट होत आहे. मंजूर विकास आराखड्यातील पार्किंगसाठी असलेले भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्रशासनाने करावी या यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहेत. आरक्षित भूखंड विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी महासभेत चर्चा झाली आहे. मात्र अमंलबजावणी अत्यंत संथ गतीने सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पार्किंगची परिस्थिती सध्या खूपचं भयावह आहे. सध्या शहरात पोखरन रोड क्रमांक २ येथील आशर रेसिडन्सीमधील सुविधा भूखंडावर बिल्डरने पार्किंग प्लाझा बांधून दिला आहे. या ठिकाणी अवघी ६१ चारचाकी वहाने आणि ४४ दोन चाकी गाड्या पार्क करण्याची व्यवस्था आहे. मात्र हा पार्किंग प्लाझा शहराबाहेर आहे. गावदेवी मैदान परिसरात स्मार्ट सिटी योजनेतून पार्किंग प्लाझाचे काम सुरू आहे. या ठिकाणी भुयारी पार्किंग उभारण्यात येत असले तरी त्या ठिकाणी मर्यादित गाड्यांचे पार्किग करण्यात येणार आहे. पालिकेच्या सर्वात जुन्या जवाहर बाग अग्निशमन केंद्राची धोकादायक इमारत पाडून त्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय झाला आहे. परंतू बीओटी तत्वावरील या प्लाझाचे काम कधी सुरू होणार आणि त्याचा फायदा नागरीकांना कधी होणार हेही गुलदस्त्यात आहे.

१. गट क्रमांक ८६ कोपरी (सीआरझेडने बाधित,पालिकेकडे ताबा नाही), २.आनंद नगर रेल्वेलाईन लगत (अतिक्रमित), ३.घोसाळे टँक (अतिक्रमित ,रस्ता उपलब्ध नाही),४.सि.स नं २९५ जुन्या चाळीत आहे (सीआरझेडने बाधित), ५.खाडी पैकी जागा एमआरटीएस स्टेशन (सीआरझेडने बाधित) , ६.सि.स नं २० अ नौपाडा (जागेवर बांधकाम आहे.), ७.चेंदणी (जुनी बांधकामे आहेत), ८.सि.स नं ३०४ (जुनी बांधकामे आहेत.), ९.सि.स नं ३७२ (अतिक्रमित आहे.),१०. नौपाडा मेंटल हॉस्पिटल (अतिक्रमित आहे.) ,११.भू. क्रमांक १५० रघूनाथनगर (अतिक्रमित तबेला आहे.) , १२. भू . क्र ५१ रामचंद्रनगर चाळीने (अतिक्रमित), १३.भू,क्र १४३ जिलानीनगर शेजारी(चाळीने व्याप्त आहे) , १४. ढोकाळी सं न १२ (आझाद नगर झोपडपट्टी), १५.ढोकाळी सं न १४ (आझादनगर झोपडपट्टी), १६.माजिवडे (गोल्डन डाइ्रज नाका जंक्शन), १७.कळवा टिमटी डेपो लगत(अतिक्रमित), १८. कळवा (रेल्वेची इमारत),१९.खारीगाव पारसिक (अतिक्रमित),२०.कळवा,स.न ३६५,३६७

( अतिक्रमित) २१.दिवा स न २४ (अतिक्रमित) झालेली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in