
राज्य निवडणूक आरोगाच्या नियमानुसार सदस्य नोंदणी असणे आवश्यक असून तशी माहिती आयोगाला देणे बंधनकारक असते. त्यानुसार डोंबिवलीत शिंदे गटाची सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आली. डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात पार पडलेल्या पहिल्या बैठकीत सभासदांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसले. तीन दिवसात ३० हजार सदस्य नोंदणी करण्यात येणार असल्याचे शिंदे गटाचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले. माजी नगसेवक राजेश मोरे यांनी सभासद नोंदणीसाठी अथक मेहनत घेतली.
या बैठकीत शिंदे गटाचे गोपाळ लांडगे, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दिपेश म्हात्रे, राजेश कदम, राजेश मोरे, नितीन पाटील, रवी पाटील, रणजीत जोशी, ऋषाली जोशी,संजय पावशे, जनार्दन म्हात्रे, विकास देसले, लता पाटील, दिपाली पाटील, अपर्णा पावशे, शरद गंभीरराव, सुजित नलावडे, संतोष चव्हाण,गजानन व्यापारी, सागर जेधे आदी मान्यवर उपस्थित होते. सभासद नोंदणीच्या पहिल्या दिवशी शिंदे गटाचे सभासद अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती.
यावेळी गोपाळ लांडगे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेतून राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ सोडून गेले त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनीही पक्ष सोडून गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही या भ्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते असे म्हणाले, ते पुढे म्हणाले, आमदार गुलाबराव पाटील यांनी १० ते १२ आमदारांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला राष्ट्रवादी संपवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले होते. आमदार पक्ष घेऊन जातील असेही पाटील यांनी पक्षप्रमुखांना सांगितले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माजी महापौर विनिता राणे आणि पालिकेच्या माध्यमातून डोंबिवली शहराचा विकास केला असेही ते म्हणाले.