पेण तालुक्यात डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनची स्थापना; सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे यांची अध्यक्षपदी निवड

कबड्डी हा खेळ देखील पारंपरिक खेळ असून या खेळाने राज्यासह देशभरात चांगल्या प्रकारे उभारी घेतली आहे
पेण तालुक्यात डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनची स्थापना; सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे यांची अध्यक्षपदी निवड

संपूर्ण देशभरात नावारूपाला आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनची पेण तालुक्यात देखील स्थापना करण्यात आली. या कर्यकरणीत सामाजिक कार्यकर्ते आणि सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी व्हॉलीबॉल हा खेळ तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोहोचविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आशी ग्वाही समीर म्हात्रे यांनी दिली. तर महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी शरद कदम यांनी व्हॉलीबॉल हा खेळ पारंपरिक खेळ असल्याने या खेळाला आपण संघटीत होऊन अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचऊ या असे आवाहन केले.

कबड्डी हा खेळ देखील पारंपरिक खेळ असून या खेळाने राज्यासह देशभरात चांगल्या प्रकारे उभारी घेतली आहे, त्याप्रमाणेच व्हॉलीबॉल हा पारंपरिक खेळ देखील देशासह अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवा यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारी डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन ही संघटना प्रयत्न करत आहे. या असोसिएशनला जवळ्पास 26 देश सलग्न असुन राज्यातील देखील 26 जिल्हे सहभागी झाले आहेत. रायगड जिल्ह्याचा विचार करता जिल्हयातील कर्जत, खालापूर, उरण,पनवेल,अलिबाग, पाली - सुधागड आदी ठिकाणी या असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून आज पेण येथे देखील स्थापना करण्यात आली. यावेळी पेण तालुका डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांची निवड करण्यात आली, तर रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे यांची कार्याध्यक्ष, रमेश म्हात्रे उपाध्यक्ष, नरेन्द्र पाटील उपाध्यक्ष, हिरामण भोईर जनरल सेक्रेटरी, रुपेश कदम सहसेक्रेटरी, नितिन वर्तक खजिनदार, सुभाष पाटील सहखजिनदार, तसेच निखिल पाटील, विलास पाटील हे सदस्य तर गजानन पाटील पंच कमिटी अध्यक्ष, नरेन्द्र पाटील पंच कमिटी सेक्रेटरी म्हणुन एकामुखी निवड करण्यात आली. यावेळी प्रसिध्दी प्रमुख म्हणुन पत्रकार संतोष पाटील आणि स्वप्नील पाटील यांची निवड करण्यात आली.

पेण तालुका डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्याप्रमाणे मी कबड्डी खेळाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली,त्याप्रमाणेच व्हॉलीबॉलची धुरा देखील चांगल्या प्रकारे सांभाळून प्रत्येक गावागावात हा खेळ पोहोचून राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर पेण तालुक्यातील खेळाडू पोहोचविण्यासाठी मी प्रयत्नशील असणार असल्याचे सांगितले. तर महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी शरद कदम यांनी आपल्या तालुक्याचा पाया मजबूत करा पाया मजबूत केला तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे कळस नक्कीच चाढवता येईल असे सांगुन कामाला लागण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in