छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य पुनस्थापित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना - युवराज छत्रपती संभाजी राजे

गावात शाखा उघडण्यासाठी मी स्वतः हजर राहणार आहे." अशी ग्वाही युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाज सभागृहात बोलताना दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य पुनस्थापित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना - युवराज छत्रपती संभाजी राजे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचे पेण नगरीत झालेले स्वागत पाहून भारावून गेलो आहे. तुम्ही माझ्याजागी छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे समजून मला मुजरा करीत आहात. मी रायगड व इतर ठिकाणी अनेकदा आलो. पण पेणकरांचे हे प्रेम पाहून भारावून गेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले सुराज्य पुनस्थापित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून सरकार दरबारी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना दबाव गट म्हणून कार्य करणार आहे. स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी गाव तेथे शाखा या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल, खालापूर व पेणमध्ये १०० शाखांचे उद्घाटन करताना वेगळे समाधान मिळत आहेत. यापुढे अनेक गावात शाखा उघडण्यासाठी मी स्वतः हजर राहणार आहे." अशी ग्वाही युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाज सभागृहात बोलताना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती युवराज संभाजी राजे यांचे पेण नगरीत मोठ्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. युवराज छत्रपती संभाजी राजे यांची मिरवणूक ढोल ताशांच्या व पुष्पवृत्तीच्या वर्षावात काढण्यात आली. त्यानंतर मराठा समाज सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्यासह आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, युवा नेते मंगेश दळवी, विनोद साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने जन जनसमुदाय उपस्थित होता.

युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वागताच्या आगमना बरोबरच सर्व कार्यक्रमाचे नियोजन युवा नेते मंगेश दळवी यांनी केले होते. त्यांच्या या नियोजनाचे कौतुक छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी केले. प्रास्ताविक मंगेश दळवी यांनी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतानाच आजच्या समाज जडणघडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चे वंशज युवराज छत्रपती संभाजी राजे यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात नव्हे तर जग तुमच्या स्वराज्याच्या संकल्पनेची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. मंगेश दळवी यांनी युवराज छत्रपती संभाजी राजे यांचे मन जिंकले. यावेळी आमदार रवीशेठ पाटील,माजी आमदार धैर्यशील पाटील, विनोद साबळे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in