‘त्या’ युवकाचा २४ तास उलटूनही शोध लागला नाही

या प्रकरणाची नोंद नारपोली पोलीस करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
‘त्या’ युवकाचा २४ तास उलटूनही शोध लागला नाही

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील माणकोली पुलावरून रील बनवून पुलावरून उडी मारणाऱ्या युवकाचा २४ तास उलटूनही शोध लागला नाही. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठा गाव खाडीत शोध सुरू केला. लाईफबोटीतून तीन अग्निशामक दलाच्या जवानांनी लाईफ-जॅकेट घालून शोध घेतला होता. अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने अग्निशामक दलाने शोध कार्य थांबवले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळीपासून शोध घेण्यास सुरुवात झाली. अग्निशामक दलाचे आठ जवान हे बोटीतून मोठा गाव खाडीत शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस आणि भिवंडीतील नारपोली पोलीस दाखल झाले होते. या प्रकरणाची नोंद नारपोली पोलीस करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in