पक्ष्यांनाही उन्हाच्या झळा; धान्य, पाणी ठेवण्याचे पक्षीप्रेमींचे आवाहन

ठाण्यातील पक्षीप्रेमींना उष्म्याचा त्रास जाणवलेले पक्षी आढळू लागले आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असून, पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या खिडकीत, गच्चीवर पाणी, धान ठेवण्याचे आवाहन आता पक्षीप्रेमींकडून करण्यात येत आहे.
पक्ष्यांनाही उन्हाच्या झळा; धान्य, पाणी ठेवण्याचे पक्षीप्रेमींचे आवाहन

ठाणे : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांसह पशू-पक्ष्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षी मूर्च्छित होतात आणि कोसळतात. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्यामुळे गच्चीवर, आवारात, रस्त्यावर पडलेले दिसतात.

ठाण्यातील पक्षीप्रेमींना उष्म्याचा त्रास जाणवलेले पक्षी आढळू लागले आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असून, पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या खिडकीत, गच्चीवर पाणी, धान ठेवण्याचे आवाहन आता पक्षीप्रेमींकडून करण्यात येत आहे. शहरात सध्या अनेक भागात गटारात, नाल्यात अथवा डबक्यात साचलेल्या पाण्यात हे पक्षी आपले शरीर आणि पंख भिजवून शरीर थंड करताना आढळत आहेत. पक्षीप्रेमी पिण्यासाठी आपल्या छतावर आणि बाल्कनीत तसेच काहीजण झाडांवर पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करत असल्याने या पक्ष्यांना मोठा दिलासा आणि आधार मिळत आहे.

वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे माणसांना नकोसे होत असतानाच अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडणाऱ्या पक्ष्यांची अवस्था ही बिकट होऊ लागली आहे. अशा भागांत अन्नाच्या शोधात पक्षी दूर अंतरावर उडत जातात.

logo
marathi.freepressjournal.in