प्रसादाचे आमिष दाखवून चिमुकलीवर अतिप्रसंग

न्यायालयाने रामलखन याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी हेमंत ढोले करीत आहेत.
प्रसादाचे आमिष दाखवून चिमुकलीवर अतिप्रसंग

कल्याण : प्रसादाचे आमिष दाखवून कल्याणमध्ये एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका ५८ वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी रामलखन यादव याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण पूर्वेतील परिसरात एक सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना या परिसरात राहणारा रामलखन यादव नावाचा व्यक्ती त्या मुलीजवळ आला. मुलगी रामलखनला ओळखत होती. रामलखनने त्या मुलीला प्रसादाचे आमिष दाखवून तिला घरात नेले. घरात नेऊन मुलीसोबत त्याने अतिप्रसंग केला. घडला प्रकार मुलीने आईला सांगितला. या प्रकरणात आईकडून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामलखन यादव याला अटक केली आहे. रामलखन हा हमालीचे काम करतो. पोलिसांनी रामलखनला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रामलखन याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी हेमंत ढोले करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in