उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत गड-किल्ले प्रदर्शन

गड-किल्ले प्रदर्शनामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थी मुले/मुलींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत गड-किल्ले प्रदर्शन

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत गुरुवारी स्व. आनंद दिघे आजी-आजोबा उद्यान, वीर जिजामाता चौक, मराठा संक्शन ३२. उल्हानगर-४ येथे सांयकाळी ५.०० वाजता गड-किल्ले प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम उपआयुक्त, महिला व बालकल्याण विभाग डॉ. सुभाष जाधव तसेच महापालिका जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे व विभाग प्रमुख (महिला व बालकल्याण) नितेश रंगारो उपस्थित होते. उपायुक्त, महिला व बालकल्याण विभाग यांनी गड-किल्ले तयार करणाऱ्या मुलांना/विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांमार्फत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गड-किल्ले प्रदर्शनामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थी मुले/मुलींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in