उरणच्या वायू वीज निर्मिती केंद्रात स्फोट;एकाचा मृत्यू, तीन गंभीर

रविवार दुपारी हा स्फोट झाला. रविवार असल्याने कामगारांची सुट्टी असल्याने विशेष वर्दळ नव्हती.
उरणच्या वायू वीज निर्मिती केंद्रात स्फोट;एकाचा मृत्यू, तीन गंभीर

उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रातील बॉयलरच्या पंपातून वाफ वाहून नेणाऱ्या पाईप लाईनचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अभियंते विवेक धुमाळे (३५) यांचा मृत्यू झाला असून तीन कामगार गंभीर भाजले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईत, ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. रविवार दुपारी हा स्फोट झाला. रविवार असल्याने कामगारांची सुट्टी असल्याने विशेष वर्दळ नव्हती. वीज तयार करण्यासाठी जी वाफ तयार केली जाते, ती वाहून जाण्यासाठी असलेल्या पाईपलाईनला पंप क्रमांक २ जवळ गळती झाली. त्या वाफेचा दाब वाढल्याने जबरदस्त स्फोट झाला. या ठिकाणी काम करीत असलेले ज्युनियर इंजिनियर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील (रा.उरण डोंगरी), विष्णू पाटील (रा.बोकडवीरा) हे या झालेल्या स्फोटात जबर भाजले आहेत. त्यातील विवेक धुमाळे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर अधिक उपचारासाठी दोघांना नवी मुंबईतील ऐरोली आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे

logo
marathi.freepressjournal.in