ठाण्यातील करदात्यांसाठी अभय योजनेस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

महानगरपालिकेने १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
ठाण्यातील करदात्यांसाठी अभय योजनेस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता करातील १०० टक्के व्याज माफीच्या अभय योजनेस दिनांक १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सदर व्याज माफी अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

महानगरपालिकेने १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, नाताळच्या सुट्ट्या असल्याने ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा नागरिकांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

जे करदाते दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीत १००% सवलत देण्यात येणार आहे. महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच Google Pay, PhonePe, PayTm, BhimApp याद्वारे करदाते ऑनलाईन पद्धतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in