Thane : ठाण्यात आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

ठाण्यातील (Thane) कासारवडवली भागात ठाणे गुन्हे शाखेकडून आठ कोटी रुपयांच्या २०००च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
Thane : ठाण्यात आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

महाराष्ट्र पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखेने बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून २००० च्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा बाजारात चलनासाठी घेऊन जाण्याची तयारी सुरू होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांना त्यांना पकडण्यात मोठे यश मिळाले.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे राम शर्मा (५२ वर्ष) आणि राजेंद्र राऊत (५५ वर्ष) अशी आहेत. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पालघरचे रहिवासी असून ते बनावट नोटा बाजारात नेण्याचे काम करत होते.

बनावट नोटा छापणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी २००० च्या नोटांचे ४०० बंडल जप्त केले आहेत. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. बनावट नोटा छापणाऱ्यांचे जाळे किती पसरले आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात २००० हजार रुपयांच्या नोटांचा होणारा तुटवडा पाहता फसवणूक करण्याचा हा प्रयत्न केला गेला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in