खोटी प्रतिज्ञापत्रे हा तेलगीपेक्षा मोठा घोटाळा; नरेश म्हस्के यांचा आरोप

पोलीस स्टेशन येथे एका नागरिकाच्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता कलम ४२० / ४६५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे
खोटी प्रतिज्ञापत्रे हा तेलगीपेक्षा मोठा घोटाळा; नरेश म्हस्के यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाला बोगस सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. या सत्यप्रतिज्ञापत्राची संख्या साडेतीन लाखांच्या घरात असल्याने हा महाराष्ट्रातील तेलगी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा असून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून गैरवापर केल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बुधवारी ठाण्यात केला , दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

दिनांक ८ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या निर्मलनगर पोलीस स्टेशन येथे एका नागरिकाच्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता कलम ४२० / ४६५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या दिवशी पोलीसांनी न्यायालय, वांद्रे, मुंबई याच्यासमोर असलेल्या काही नोटरी करणाऱ्या कार्यालयांवर धाडी टाकल्या असता, तेथे ४ हजार ६८२ सत्यप्रतिज्ञापत्र आढळून आली ती संबंधित विभागाने जप्त केली आहेत. सदरची सत्यप्रतिज्ञापत्र ही महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या नावे असल्याचे समजते. यासाठी करोड़ों रुपयांचा खर्च झालेला आहे. यामध्ये कायद्याचे कुठलेही पालन न करता बेकायदेशीररित्या स्टॅम्प पेपर, लाल शिक्के, नोटरीचे स्टॅम्प याच्या माध्यमातून अनोळखी नागरिकांच्या आधारकार्डच्या झेरॉक्स पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहेत. सदर सत्यप्रतिज्ञापत्रातील काही ठराविक नागरिकांना संपर्क केला असता, त्या सर्वांनी आम्ही अशी कुठलीही सत्यप्रतिज्ञापत्र व त्यावर स्वाक्षरी आमच्या माध्यमातून केली नसल्याचे सांगण्यात आल्याचे कळते. त्यामुळे ही सर्वच्या सर्व प्रतिज्ञापत्र खोटी असल्याचा दाट संशय निर्माण होतो, असा आरोप म्हस्के यांनी केला आहे.

मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या

कोट्यावधी रकमेचा व्यवहार शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीर कामासाठी होत असेल तर यात जे जे सहभागी आहेत त्यांच्यासह मुख्य सूत्रधाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही केली आहे. कारण हा संपूर्ण भारतात गाजलेल्या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यासारखाच घोटाला असण्याची शक्यता असल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in