
जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पारंपारिक पद्धतीने पावसाच्या पाण्यावर शेती करण्यात येत असायची, परंतु सध्या अपुरे मनुष्यबळ आणि वेळेची बचत, शिवाय महाग झालेली बैलजोडी या सगळ्या बाबींचा विचार होत, शेतकरी हा काही तासांकरिता ट्रॅक्टरचा वापर करून शेती करण्याला अधिक पसंती देऊ लागला आहे. यामुळे खर्चात बचत होऊन वेळही कमी लागत आहे.
पावसाळा म्हटला की, जव्हारच्या ग्रामीण भागात डोळ्यांसमोर हिरवेगार शेत उभे राहते. शेतात बैलजोडीद्वारे नांगरणी, वखरणी, चिखलणी करणे यासाठी शेतात चालणारे लाकडी नांगर आणि त्यांना हाकताना शेतकऱ्यांच्या मुखातून घुमणाऱ्या आवाजाची आठवण ताजी होते.
तालुक्यात पूर्वी शेतकरी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करायचे. मात्र, अलीकडे प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने आपली शेती कामे उरकण्याच्या प्रयलात असतात. यांत्रिक युगात शेतकरी मशागतीसाठी व शेतीविषयक विविध कामांसाठी ट्रॅक्टरला पसंती देत आहेत. ट्रॅक्टरचा वापर केल्याने शेतकऱ्यांच्या शारीरिक श्रमाची व वेळेचीही बचत होते. आजच्या आधुनिक युगात शेतात नांगर ओढणारी बैलांची जोडी दिसेनाशी झाली असून, त्याऐवजी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल यामुळे
सर्जा-राजाची सुडौल डौलदार बैलजोडी, शेती कामासाठी लागणारी विविध लाकडी अवजारे जून महिना उजाडला की, शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर, वखर, तिफण दुरुस्त करून व्यवस्थित करणे, शेती कामासाठी नवीन लाकडी अवजारे तयार करणे, एखादा बैल निकामी असल्यास दुसरा बैल शोधून खरेदी करणे, नांगरणी व चिखलणीसाठी उपयुक्त अशा मजबूत लाकडाचा शोध घेणे आदी कामांची खरीप हंगामात शेतकऱ्यांची लगबग सुरू होत असे. मात्र, आधुनिकतेमुळे काळानुरूप हे चित्र आता बदलल्याचे दिसून येत आहे.