Shocking Video: भाईंदरला ट्रेनखाली पिता-पुत्राची आत्महत्या

भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी ११. ३०च्या सुमारास विरार-चर्चगेट लोकलखाली रुळावर डोके ठेवून पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना घडली.
Shocking Video: भाईंदरला ट्रेनखाली पिता-पुत्राची आत्महत्या
X

भाईंदर : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी ११. ३०च्या सुमारास विरार-चर्चगेट लोकलखाली रुळावर डोके ठेवून पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना घडली. भाईंदर रेल्वे स्थानकातून आत्महत्या करण्यास जाताना व लोकलखाली झोकून देतानाचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या आधी व खाडी पुलादरम्यान रेल्वे लोकलखाली दोघांनी आत्महत्या केली. दोघांचे डोके लोकलच्या चाकाखाली आल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. दोघांचे मृतदेह अनोळखी म्हणूनच भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात नेण्यात आले. रात्री त्यांचे अनोळखी म्हणूनच शवविच्छेदन केले गेले. मंगळवारी वसई रेल्वे पोलिसांनी दोघांच्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटवली. हरिश मेहता (६०) व मुलगा जय मेहता (३०) अशी त्यांची नावे असून, ते पिता-पुत्र आहेत. वसईच्या वसंत नगरी भागात ते राहत होते. भाईंदर प्लॅटफॉर्म ६ वरून वडील व मुलगा हे दोघे एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने चालत जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. प्लॅटफॉर्मवरून उतरून काही अंतर चालून गेल्यावर दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर झोपले. लोकल ट्रेनसमोर दोन जण येताना पाहून रेल्वे लोको पायलटने लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रेल्वे थांबेपर्यंत दोघेही रेल्वेच्या खाली आले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

ट्रेनसमोर येऊन पिता-पुत्राने आपले जीवन संपवले आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in