धक्कादायक! पोटच्या मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, बापाला पोलिसांनी घातल्या बेड्या

नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन पीडितेने आपल्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! पोटच्या मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, बापाला पोलिसांनी घातल्या बेड्या

भाईंंदर : भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री झोपल्यावर पित्याने तिच्या छातीला व कंबरेला स्पर्श केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पित्यावर नवघर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन पीडितेने आपल्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित ही वडिलांबरोबर राहत आहे. रात्री झोपेत असताना दोन ते तीन वेळा वडिलांनी तिच्या छातीला स्पर्श करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत असे. याबाबत पीडितेची बहीण देखील पीडितेस मारहाण करून धमकी देत असल्याचे पीडितेने म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू फडके हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in