शिवीगाळ करतो म्हणून तोंडात कागदाचा बोळा कोंबून वडिलांनीच केली नऊ वर्षीय मुलाची हत्या

शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून आपल्या नऊ वर्षीय मुलाच्या तोंडामध्ये वहीच्या पानांचा बोळा कोंबून त्याची हत्या
शिवीगाळ करतो म्हणून तोंडात कागदाचा बोळा कोंबून वडिलांनीच केली नऊ वर्षीय मुलाची हत्या

शहापूर : शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून आपल्या नऊ वर्षीय मुलाच्या तोंडामध्ये वहीच्या पानांचा बोळा कोंबून त्याची हत्या करणाऱ्या एकनाथ गायकवाड यास कसारा पोलिसांनी अटक केली आहे. मुलाच्या हत्येबाबत अगोदर बनाव रचण्यात आला, मात्र पोलीस तपासाअंती एकनाथ यानेच हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले.

शहापूर तालुक्यातील कसारा विभागातील वाशाला या ठिकाणी एकनाथ गायकवाड राहत असून त्याच्यासमवेत त्याचा भाऊ आणि नऊ वर्षीय युवराज नावाचा त्याचा मुलगा राहत होता. एकनाथ गायकवाड याला दारूचे व्यसन होते. घरगुती कारणांमुळे झालेल्या भांडणामुळे त्याची पत्नी गेल्या चार महिन्यांपासून वेगळी राहत आहे. आपली आई वेगळी राहते तसेच वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे युवराज आपल्या वडिलांना शिवीगाळ करत असायचा. त्यामुळे एकनाथ यास युवराजचा प्रचंड याचा राग येत असे. घराबाहेर खेळण्यासाठी गेलेल्या युवराजला वडिलांनी बोलवल्यानंतर युवराजने वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याचा राग एकनाथला आल्याने त्याने घराशेजारील शेतात युवराजला नेले व त्या ठिकाणी त्याच्या तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून त्याची हत्या केली. हत्या झाल्यानंतर त्याने युवराजला एका अज्ञात व्यक्तीने अपहरण करून त्याची हत्या केल्याचा पद्धतशीर बनाव रचण्यात आला. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपास केला. घटनास्थळी श्वानपथकही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेत या हत्येचा बनाव उघड करण्यात आला.

या हत्येबाबत ठाणे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे, शहापूर विभागीय पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे. गुन्हे शाखेचे सुरेश मनोरे याबाबत अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in