मुंब्रा बायपास रोडवर पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती कायम

रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून गाड्या चालवणे अवघड झाले आहे
मुंब्रा बायपास रोडवर पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती कायम

ठाणे, कळवा, मुंब्रा मार्गे डोंबिवलीकडे जाण्यासाठी रेल्वेला समांतर रस्ताच नाही जो रस्ता मंजूर झाला होता तो सरकारने बासनात गुंडाळला आहे. सध्या डोंबिवली, कल्याण आणि पनवेलमार्गे पुणे, सातारा कोल्हापूर,बंगलोरकडे जाण्यासाठी ज्या मुंब्रा बायपास रस्त्याचा वापर केला जातो त्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून गाड्या चालवणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात डोंगर परिसरातून ठिकठिकाणी पाण्याचे लोट खाली येत असतात त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती कायम आहे.

जुना मुंबई - पुणे रस्ता मुंब्रा कौसा मार्गे शिळफाटा ते पुढे पनवेलकडे जातो तर याच रस्त्यावरून शिळफटा ते आंबिवली, अंबरनाथ, उल्हसनगर अशी वाहतूक होत असते. मुळात ठाणे ते कळवा मुंब्रा या मुख्य रस्त्यावर फारसे खड्डे नसले तरी काही ठिकाणी हा रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना बरीच कसरत करत मार्गक्रमन करावे लागते. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कौसा या मार्गवर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा लागत होत्या, त्यामुळे ही कोंडी सोडवण्यासाठी रेल्वेस्टेशन बाहेर उड्डाणपूलावर मुंब्रा बायपास मार्गे बिओटी तत्वावर नव्या बायपास रस्त्याची निर्मिती करण्यात आली, मात्र तरी देखील या परिसरातला वाहतूक कोंडीचा शाप सुटायला तयार नाही.

कौसा परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा फेरीवाले रस्त्यातच बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी कायम वाहतूकीचा बोजवारा उडालेला असतो.

दरम्यान पुढे शिळफाट्याकडे जाताना गेल्या काही वर्षात वाढलेली वाहतूकीची समस्या सोडवण्यासाठी जे रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते ते आता संपत आले असले तरी या परिसरातल्या वाहनांच्या रांगा काही संपायला तयार नाहीत.

मुंब्रा बायपास मार्गे पनवेल, नवी मुंबई, न्हावाशेवा, जेएनपीटी बंदराकडे जाणारी बहुतांशी अवजड वाहने बायपास मार्गे जातात परंतू या रस्त्याची बांधनी त्या पध्दतीची नसल्यामुळे सुरू झाल्यापासून बायपासची गाडी काही रूळावर आलेली दिसली नाही. महत्वाचे म्हणजे आठ वर्षांपूर्वी वर्षी खड्डे बुजवा आणि नंतरच टोल वसूल करा अशी भूमिका तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यानींच घेतल्यामुळे राज्यभरातील बरेच टोल नाके बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता, जो पर्यंत टोल वसुली चालू होती तो प्रयन्त काही प्रमाणात रस्ते दुरुस्ती होत होती मात्र टोल ल बंद झाल्यापासून रस्त्याची दुरुस्ती देखील बंद झाली होती त्यामुळे चार वर्हपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास दोन महिने बायपास बंद ठेवावा लागला होता.

मात्र आताही खड्ड्यांमुळे या रस्त्यांची अवस्था भयावह झाली आहे. पावसाळ्यत या रस्त्यांवर अनेक ठीकाणी अपघात होत असतात, त्यामुळे या महत्वाच्या रस्त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मुंब्रा बायपास हा रस्ता महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावर नेहमी गाड्यांची गर्दी असते तसेच या मार्गावरून मोठ मोठ्या गाड्या तसेच जड वाहनांची अधिक वाहतुक होत असल्यामुळे संपुर्ण रहदारीवर याचा प्रभाव पडत असतो. त्यात पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. त्यात दरडची भर पडू नये यातच प्रवासी आनंद मानतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in