सांडपाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी

नेरळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सांडपाण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी

कर्जत : सांडपाण्याच्या वादातून उक्रुळ येथे दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांचा वापर झाल्याने तीन जणांच्या डोक्याला मोठी गंभीर दुखापत झाली असून, काहींच्या हात, पाय आणि अंगावर जखमा झाल्या आहेत. याबाबत आता नेरळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या उक्रुळ येथे दुपारी साडे १२ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत थोरवे आणि संतोष थोरवे या दोन संख्या भावांमध्ये किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शिवीगाळ त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारी मध्ये झाले. घरातील शौचालयाच्या सांडपाण्यावरून हा वाद झाला.

त्यातूनच सुरुवातीला लहान मुलाला दगड मारल्याचा प्रकार घडला. यावरून संतोष थोरवे आणि चंद्रकांत थोरवे या सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत लाकडी दांडके, लोखंडी रॉड मिळेल त्या साहित्याचा वापर एकमेकांकडून या हाणामारीत झाल्याने जो मदतीला येईल त्यालाही मार बसला. कुटुंबातीलचं तीन जणांवर गंभीर दुखापत झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in