अखेर सहा महिन्यांच्या निशंकची झुंज संपली

अवघ्या ६ महिन्यांच्या निशंक हर्षदा मयूर पगारे याच्या असामयिक निधनाने पगारे कुटुंबावर तसेच स्वराज्य संघटनेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अखेर सहा महिन्यांच्या निशंकची झुंज संपली
Published on

उल्हासनगर : अवघ्या ६ महिन्यांच्या निशंक हर्षदा मयूर पगारे याच्या असामयिक निधनाने पगारे कुटुंबावर तसेच स्वराज्य संघटनेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हृदय विकाराशी लढा देत असलेल्या या चिमुकल्याने वाडिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. निशंकच्या निधनाने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.

निशंकच्या प्रकृतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून काळजीची स्थिती होती. त्याच्या हृदयाच्या विकारासाठी विविध नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, काल रात्री १ वाजता निशंकने शेवटचा श्वास घेतला आणि पगारे कुटुंबाचे आधारस्तंभ हरपले. निशंकच्या उपचारांसाठी पगारे कुटुंबाने आर्थिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर जिवाचे रान केले. त्याच्या उपचारासाठी स्वराज्य संघटनेने जनतेस मदतीचे आवाहन केले होते, ज्याला तळागाळातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. परंतु, नियतीच्या या कठोर निर्णयापुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

‘निशंकच्या जाण्याने आमचे मन हेलावले आहे. पगारे कुटुंबाच्या या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.’ अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जय गायकवाड यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in