अखेर आ. प्रताप सरनाईक यांची मंत्रिपदावर वर्णी

दोन वेळा मंत्रीपद हुकलेल्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
आ. प्रताप सरनाईक शपथ घेताना
आ. प्रताप सरनाईक शपथ घेतानाएक्स
Published on

ठाणे : दोन वेळा मंत्रपद हुकलेल्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली आहे. सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एक लाखांच्यावर मताधिक्य मिळाले होते.

वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले तीन वर्ष ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तर यावेळी देखील याच मतदारसंघातून चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. २००८ साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेच्याच शिवसेनेतून त्यांची आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

सरनाईक यांनी सन १९९५ मध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. सन १९९६ ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सन १९९२ ते १९९७ या कालावधीत ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते. सन १९९७ ते २००८ सलग तीनवेळा ठाणे महापालिका नगरसेवक निवडून गेले. सन २००९ साली एमएमआरडीएच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर शिवसेनेच्याच तिकीटावर सन २००९ साली ओवळा-माजिवडा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग तीन वर्ष ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. सन २०१४ साली त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या मीरा -भाईंदर संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. सन २०२० मध्ये शिवसेना प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली. आता २०२४ मध्ये ओवळा-माजिवडा मतदारसंघातूनच ते चौथ्यांदा विजयी झाले असून आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in