अखेर दातीवली रेल्वे स्थानकात तिकीट घर स्थापन!

दिवा रेल्वे स्थानकानंतरचे कोकण रेल्वे मार्गांवरील पहिले असलेले दातीवली रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून तिकीट घरअभावी अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
अखेर दातीवली रेल्वे स्थानकात तिकीट घर स्थापन!

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकानंतरचे कोकण रेल्वे मार्गांवरील पहिले असलेले दातीवली रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून तिकीट घरअभावी अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार व दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी तसेच स्थानिक नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने शुक्रवारी दातीवली स्टेशन (कोकण रेल्वे) येथे तिकीट घर सुरू करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे तसेच दिवा वसई, पनवेल या रेल्वे मार्गावरील स्टेशन दिवा शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच दातीवली गाव येथे असल्याने दिवा शहरातील अनेक प्रवासी, नोकरदार वर्ग पनवेल, वसई रेल्वे मार्गे मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात त्यामुळे येथे तिकीट घराच्या अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in