परतीच्या पावसामुळे वीटभट्टी मजुरांची आर्थिक कोंडी

परतीच्या पावसामुळे तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय लांबला आहे,त्यामुळे येथील मजुरांचे चांगलेच हाल झाले आहेत.
परतीच्या पावसामुळे वीटभट्टी मजुरांची आर्थिक कोंडी
Published on

जव्हार तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष संघटनेकडून मतदाराला आमिष दाखवण्याकरिता गुपचूप जेवणावळी सुरू झाल्या आहेत. प्रचाराला देखील जोमाने सुरुवात झाली आहे. ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १६ तारखेला होणार असल्याने प्रत्येक गाव-पाड्यात निवडणुकीचा अगदी धुराळा उडाला आहे. मात्र निवडणूक संपल्यावर रोजगाराचे काय? असा प्रश्न मजुरांना सतावत आहे.

दिवाळीपूर्वी वीटभट्टी वर मजुरीचे काम करून चार पैसे जमवून दिवाळी सण साजरा करण्याचा उद्देश ठेवणाऱ्या मजुरांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय लांबला आहे,त्यामुळे येथील मजुरांचे चांगलेच हाल झाले आहेत.

तालुक्यात काही दिवसांपासून एकीकडे परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होईल की काय, या चिंतेत शेती व्यावसायिक आहेत तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे वीट व्यवसाय लांबणीवर पडत असल्यामुळे वीट व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज विजांच्या कडकडाटासह एक-दोन तास पाऊस कोसळत आहे.पावसामुळे हळव्या वाणातील काही भातपिकांची कापणी करता येऊ शकत नाही. त्यामुळे ती कापणी हंगामातूनच निघून चालली आहेत. भाताच्या लोंब्या शेतातच गळून जात आहेत.

साधारणतः वीट उत्पादक दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. हा पाऊस असाच सलग आठ दिवस सुरू राहिला तर दिवाळीच्या मुहूर्तावर वीट व्यवसाय सुरू करता येणार नसल्याची नाराजी वीट व्यावसायिकांसोबत मजुरांमध्ये पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in