सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला आग

उरण तालुक्यात जेएनपीएच्या अनुषंगाने होणाऱ्या आयात निर्यात माल साठवून ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने गोदामे आहेत.
सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला आग

उरण : विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील सामवेदा लॉजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला सोमवारी दुपारी ठिक २:३०च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीची तीव्रता एवढ्या प्रमाणात होती की, संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र ही आग कशी लागली, की कोणी जाणूनबुजून लावली, याबाबत येथील ग्रामस्थांमध्ये कुजबुज सुरू होती.

अनधिकृत गोदामांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नाही

उरण तालुक्यात जेएनपीएच्या अनुषंगाने होणाऱ्या आयात निर्यात माल साठवून ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने गोदामे आहेत. उरण पूर्व भागात तर सिडको/नैना, सुरक्षा विभागाची परवानगी न घेता ही गोदामे उभारली आहेत. या गोदामांमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निरोधक यंत्रणा नसते. त्यामुळे लहानशा आगीने देखिल गोदामे भस्मसात होतात. काही वेळेस तर जाणूनबुजून गोदामांना आगी लावण्याचे प्रकार करतात आणि विम्याचा फायदा घेतात. सोमवारी आग लागलेल्या गोदामात देखील कोणतीही अग्निरोधक यंत्रणा नव्हती. याबाबत या गोदामाचे व्यवस्थापक उमेंद्र कत्रे यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in