सिंगापूर प्लाझा शॉपिंग सेंटरमध्ये आग

जर ही आग रात्री लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता, आग सकाळी लागल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे तेथील नागरिकांनी सांगितले.
सिंगापूर प्लाझा शॉपिंग सेंटरमध्ये आग
PM

भाईंदर : मीरारोड येथील नयानगर भागात असलेल्या सिंगापूर प्लाझा मध्ये मीटर बॉक्स ला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने तात्काळ पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

मीरारोड येथील नयानगर च्या मध्यवर्ती भागात सिंगापूर प्लाझा हे शॉपिंग सेंटर आहे. या शॉपिंग सेंटर मध्ये सोमवारी अचानक सकाळी नऊ ते सव्वा नऊ च्या सुमारास मीटर बॉक्स मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याचे लक्षात येताच तेथे एक जागरूक नागरिक नास्ता करण्यासाठी आले होते त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी बाजूला असलेली एक भिंत तोडून आत प्रवेश केला व आगीवर नियंत्रण मिळवले. अर्धा तासात आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून मीटर बॉक्स पूर्णपणे जाळून खाक झाले आहे. आजूबाजूच्या दुकानाचे थोडे नुकसान झाले आहे.

जर ही आग रात्री लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता, आग सकाळी लागल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे तेथील नागरिकांनी सांगितले. मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. या सिंगापूर प्लाझा मध्ये अनेक नाश्त्याची अवैधपणे दुकाने थाटली आहेत. यावर महापालिका कारवाई करत नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in