मीरा-भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला आग लागणे सुरूच

कचऱ्याच्या लिचेडमुळे खालची शेत जमीन नापीक झाली असून विहरीचे पाणी खराब झाले आहे. सदर कचऱ्याच्या डोंगरास आग लागणे हे नेहमीचे झाले आहे. साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास आग लावली जात असल्याचा आरोप सुद्धा होत आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला आग लागणे सुरूच

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील धावगी डोंगरावर असलेल्या डम्पिंगला आग लागणे सुरूच असून पुन्हा येथील कचऱ्याच्या डोंगरास भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात सर्वत्र घातक अशा विषारी धुराचे साम्राज्य पसरले आहे.

शासनाकडून मीरा-भाईंदर महापालिकेला उत्तनच्या धावगी डोंगरावरील सरकारी जमीन घनकचरा प्रकल्पासाठी मोफत दिली असताना पालिकेने त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊ दिले आहे. अतिक्रमणांवर कारवाई न करता त्याला संरक्षण देताना दुसरीकडे कचऱ्यावर प्रक्रियाऐवजी गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा कचरा टाकून डोंगर उभा राहिला आहे. कचऱ्याच्या लिचेडमुळे खालची शेत जमीन नापीक झाली असून विहरीचे पाणी खराब झाले आहे. सदर कचऱ्याच्या डोंगरास आग लागणे हे नेहमीचे झाले आहे. साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास आग लावली जात असल्याचा आरोप सुद्धा होत आहे.

ग्रामस्थांमध्ये नाराजी

घातक धुरामुळे परिसरात प्रदूषण पसरून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला यांसारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होत असून सततच्या लागणाऱ्या आगीला रोखण्यात पालिका प्रशासन व ठेकेदार सपशेल अपयशी ठरले असल्याचा संताप येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. साठलेला कचरा येथून तत्काळ हटवावा व शहरात लहानलहान कचरा प्रकल्प तत्काळ सुरू करून उत्तन भागातील नागरिक आणि निसर्गावर केला जात असलेला अत्याचार-अन्याय थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in