चीनमधून आलेले ११ कोटी रुपयांचे फटाके जप्त

भारतात बंदी असलेले फटाके हे दोन कंटेनरमध्ये आणण्यात आले होते. चीनमधून एमओपी रॉड आणि ब्रश क्लिनरच्या नावाखाली हे आयात केले होते.
चीनमधून आलेले ११ कोटी रुपयांचे फटाके जप्त

उरण : जेएनपीए बंदरातून दोन दिवसांपूर्वीच दोन कोटी रुपयांचे २८ लाख मोरपिसे जप्त केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा चीनमधून भारतात चोरट्या मार्गाने आयात केलेले ११ कोटी रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत. जवाहरलाल नेहरू कस्टम विभागाच्या सेन्ट्रल इंटेलिजंस युनिट (सीआययु) ने ही कारवाई केली.

भारतात बंदी असलेले फटाके हे दोन कंटेनरमध्ये आणण्यात आले होते. चीनमधून एमओपी रॉड आणि ब्रश क्लिनरच्या नावाखाली हे आयात केले होते. सीआययूच्या अधिकाऱ्यांना या कंटेनरबाबत संशय आल्यामुळे त्यांनी या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये हे विविध प्रकारचे फटाके आढळून आले. सीमाशुल्क विभागाने हे कंटेनर जप्त केले असून मालाची आयात कोणी आणि कशासाठी केली, याबाबतचा तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in