बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार; मित्रानेच मित्रावर केला हल्ला, थरार Video मध्ये कैद

बदलापूर रेल्वे स्थानकावर गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार; मित्रानेच मित्रावर केला हल्ला, थरार Video मध्ये कैद
Published on

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकावर गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मित्रांमधील पैशांच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारात शंकर संसारे नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, शंकर संसारे, विकास पगारे आणि आणखी दोन मित्रांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. या वादामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. चारही मित्र बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर सायंकाळच्या सुमारास भेटले आणि वाद आणखीनच उग्र झाला. संतापलेल्या विकास पगारेने आपल्या जवळील बंदुकीने शंकर संसारे याच्यावर गोळीबार केला. यात संसारेच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला.

गोळीबार होताच स्टेशनवरील लोकांनी घाबरून आरडाओरड सुरू केली. मात्र, घटनास्थळी तत्काळ पोहचलेल्या पोलिसांनी धाडसी कारवाई करत विकास पगारेला अटक केली आणि त्याच्याकडून गोळीबारात वापरलेली बंदूक

जप्त केली. रेल्वे पोलिसांनी शंकरला लगेच ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे.रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in