केडीएमसी हद्दीतील ६२७ निरक्षरांची प्रथम चाचणी

केडीएमसी हद्दीतील ६२७ निरक्षरांची प्रथम चाचणी; ८२ केंद्रांवर परीक्षा
 केडीएमसी हद्दीतील ६२७ निरक्षरांची प्रथम चाचणी

डोंबिवली : महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना) विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या निरक्षरांची प्रथम चाचणी परीक्षा रविवारी पार पडली. या चाचणीचे पूर्व नियोजन क.डों.मनपा शिक्षण विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने केली होते.

सीआरसी प्रमुख आणि परीक्षा केंद्रांचे संचालक यांना मिटिंगमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. क.डों.मनपा शिक्षण विभाग क्षेत्रातील ८२ परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते संख्याकाळी ५ वाजेपर्यंत ६२७ निरक्षरांनी प्रथम चाचणी परीक्षा शांततेत दिली. परीक्षा केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, एसएसए कर्मचारी यांनी भेटी देऊन परीक्षाबाबतचा आढावा घेतला.

सदरील परीक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे आणि प्रशासन अधिकारी रंजना राव यांच्या आदेशाने आणि सूचनेनुसार सदरील परीक्षा पार पडली आहे. शिक्षण विभागाचे सदरील परीक्षेचे कामकाज शि.वि.अधिकारी लक्ष्मण जाधव, नोडल अधिकारी आणि चंद्रमणी सरदार विषय तज्ज्ञ तसेच तंत्रस्नेही शिक्षक विलास विखार यांनी काम बघितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in