उत्तनच्या समुद्रात मासेमारी बोटीला आग

उत्तनच्या पातान बंदर येथे समुद्रकिनारी उभ्या केलेल्या सिरील घावट्या यांच्या राजश्री नावाच्या मासेमारी बोटीला सकाळी नऊच्या सुमारास अचानक आग लागली.
उत्तनच्या समुद्रात मासेमारी बोटीला आग

भाईंंदर : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील पातान बंदर समुद्रकिनाऱ्याजवळ उभ्या करण्यात आलेल्या मासेमारी बोटीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत पूर्ण बोट जळून खाक झाली असून मच्छिमाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उत्तनच्या पातान बंदर येथे समुद्रकिनारी उभ्या केलेल्या सिरील घावट्या यांच्या राजश्री नावाच्या मासेमारी बोटीला सकाळी नऊच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच आसपासच्या मच्छिमारांनी तत्काळ पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत बोट जाळून खाक झाली होती. या आगीत मासेमारी जाळी, बोटीची तांडेलची केबीन, मासळी साठविण्याचे शीतगृह, खलाश्यांची राहण्याची जागा, जीपीएस व वायरलेस यंत्रणा तसेच अन्नधान्य असे मिळून एकंदर तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बोटीची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असून त्याला बरेच दिवस लागणार आहेत. त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावरच चालत असल्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी सिरील घावट्या यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in