मीरारोडमध्ये मोकळ्या जागेत पाच गॅस सिलिंडरचे स्फोट; सुदैवाने जीवितहानी नसल्याने मोठी घटना टळली

मीरारोड पूर्व रामदेव पार्क येथे के.डी. एम्पायर बिल्डिंगशेजारी पार्क येथे सालासर ग्रुपच्या इमारतीचे नवीन बांधकाम चालू असताना कामगारांना राहण्यासाठी काही मोकळी जागा देण्यात आली होती. त्यात कामगारांचे त्या झोपडीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला.
मीरारोडमध्ये मोकळ्या जागेत पाच गॅस सिलिंडरचे स्फोट; सुदैवाने जीवितहानी नसल्याने मोठी घटना टळली

भाईंदर : मीरारोड पूर्वेच्या रामदेव पार्क रोड परिसरात बिल्डरांच्या मोकळ्या जागेत कामगारांचे कँटीन असलेल्या ठिकाणी पाच गॅस बाटले फुटल्याने मीरारोड परिसर हादरले असून, त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यात कामगारांच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

मीरारोड पूर्व रामदेव पार्क येथे के.डी. एम्पायर बिल्डिंगशेजारी पार्क येथे सालासर ग्रुपच्या इमारतीचे नवीन बांधकाम चालू असताना कामगारांना राहण्यासाठी काही मोकळी जागा देण्यात आली होती. त्यात कामगारांचे त्या झोपडीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार, एका मागोमाग एक अशा पाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या आगीच्या भडक्यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब कार्यरत होते. तसेच सदर जागेच्या आजूबाजूला लहान मुलांच्या शाळा आणि आजूबाजूला परिसरात रहिवासी राहत आहेत. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कामगारांचे काही सामान वाचवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आले आहे. अशी माहिती अग्निशामक अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले आहे. तसेच सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व मीरारोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे हे घटना स्थळावर हजर होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in