पाण्याचे पाईप चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाण्याचे पाईप चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे पाण्याचे पाईप चोरी प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून पाण्याचे पाईप आणि टेम्पो असा १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. उल्हासनगर महापालिकेचे काँट्रॅक्टर अभिषेक संजय सिंग यांनी उल्हासनगर महापालिका हद्दीत पाण्याचे पाईप टाकण्याकरिता जिंदाल कंपनीचे २७ पाईप विकत घेतले होते. ते पाईप शांतीनगर प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल जवळ ठेवले होते. १० जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी पाईप चोरी केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in