कल्याण : कल्याण जिल्हा कारागृहातही (आधारवाडी जेल) जेल प्रशासनातर्फे मुंबई परिसर विपश्यना केंद्राच्या सहकार्याने एफएम रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (कारागृह आणि सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांच्या मुलाखतीने कल्याण जेलमधील या एफएम केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कल्याण जेल अधीक्षक आर. आर. भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जे. ए. काळे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. एफएम रेडिओ कक्षामध्ये कारागृहातील बंदी सिध्देश पांचाळ यांनी रेडिओ जॉकीची भूमिका पार पाडली. यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इत्यादी कारागृहामध्ये एफएम रेडिओ सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत
थोडासा विरंगळा म्हणून आणि कैद्यांना सकारात्मकतेकडे नेण्याकरीता कारागृहात एफएम रेडिओ सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. एफएम रेडिओ कक्षामध्ये कारागृहातील बंदी सिद्धेश पांचाळ यांनी रेडिओ जॉकी बनला.
कल्याण जेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या एफएम रेडिओच्या माध्यमातून कैद्यांच्या आरोग्याकरीता घ्यायच्या काळजीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रम, मनोरंजनाकरिता मनपसंद गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र कारागृह विभागात सुरू संगणकीकरणातंर्गत कल्याण कारागृहामध्ये किऑस्क मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनच्या माध्यमातून कैद्यांना त्यांच्या केसची पुढील तारीख, त्यांच्या बँक खात्यावरील जमा रक्कम, मुलाखतीबाबतच्या नोंदी आदी माहिती एका क्लीकमध्ये उपलब्ध होणार आहे. या मशीनचेही अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी कारागृहातील बंदी पांचळ यांनी अमिताभ गुप्ता यांची रेडिओ एफएमवर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा आणि सोयीसुविधेबाबत चर्चा केली. कारागृहातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कैद्यांना नियमानुसार देण्यात आलेल्या व्हिडीओ कॉल, कॉईनबॉक्स, मनीऑर्डर मर्यादेमध्ये करण्यात आलेली वाढ आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच कैद्यांच्या पुनर्वसनाकरीता नियमानुसार भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
- अमिताभ गुप्ता, अप्पर पोलीस महासंचालक