बाल आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थांची रेलचेल

शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली मुणगेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
बाल आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थांची रेलचेल

डोंबिवली : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत गुरुवारी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळा समितीच्या सदस्या दीपा आपटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी काढलेल्या खाद्यपदार्थांच्या चित्र संग्रहाचे अनावरण करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली मुणगेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. आजच्या मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे गेम्स आणि खाद्यपदार्थ यांचे एकूण ३३ स्टॉल्स विद्यार्थ्यांकडून लावण्यात आले होते. आपटे यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पदार्थ विकत घेऊन त्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला. इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थी व पालकांनी आनंद मेळाव्यात सहभागी होऊन पाणीपुरी, भेळपुरी, ब्रेड पिझ्झा, पॅटीस, चाट मिसळपाव, पावभाजी आणि वेगवेगळ्या पदार्थांचे सरबत, आईस्क्रीम यांचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी- विक्री, नफा-तोटा या गणिती संकल्पना त्याचबरोबर पदार्थाची पौष्टिकता, आरोग्यास पोषकता या विषयाकडे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे लक्ष दिले.

logo
marathi.freepressjournal.in