माघी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष पथकाची स्थापना; महापालिकेच्यावतीने सुविधा उपलब्ध

दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, रायलादेवी तलाव, उपवन तलाव येथे विसर्जनासाठी प्रत्येकी दोन टाक्यांची सोय करण्यात आली आहे.
 माघी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष पथकाची स्थापना; महापालिकेच्यावतीने सुविधा उपलब्ध

ठाणे : माघी गणेशोत्सवातील गणेशाचे विसर्जन सुनियोजित पद्धतीने व्हावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या विविध विसर्जन घाटावर महापालिकेच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाच, सात दिवसांच्या गणेशाच्या विसर्जनानंतर गणपती मूर्ती खाडीच्या किनाऱ्यालगत येऊन तरंगतात व भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी तसेच विसर्जन घाटावर विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कोपरी, कोलशेत, पारसिक रेतीबंदर, बाळकूम, कळवा व दिवा या ठिकाणच्या खाडीकिनाऱ्यांवर विसर्जन घाट असून या ठिकाणीही विसर्जनासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच माजिवडा मानपाडा येथील रेवाळे तलाव, मासुंदा तलाव, दत्त घाट, खारेगांव तलाव, न्यू शिवाजीनगर कळवा तलाव येथे कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, रायलादेवी तलाव, उपवन तलाव येथे विसर्जनासाठी प्रत्येकी दोन टाक्यांची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in