अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी चाैघांना अटक

सदरील घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चार आरोपींना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले
अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी चाैघांना अटक
Published on

भाईंंदर : भाईंदर पूर्वेला बी. पी. क्रॉस रोडवर असलेल्या भाजी मार्केट येथे सार्वजनिक शौचालयाच्या गल्लीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आला होता. त्यात मयताची ओळख पटली नाही, मात्र पोलिसांनी सदरील गुन्ह्यात चार आरोपींना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले आहे.

भाईंदर पूर्वेला सोमवारी साधुराम हॉटेल, भाजी मार्केटजवळ, बी. पी. क्रॉस रोड या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये लघवीकरिता जात असताना शौचालयाचे गल्लीमध्ये एका ३० वर्षीय व्यक्तीचा कोणीतरी खून केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चार आरोपींना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले आहेत. तर सदरील गुन्ह्याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे तुकाराम सकुंडे हे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in