भिवंडीत इमारतीखालील चार दुचाकी अज्ञाताने जाळल्या

शहरातील कल्याणरोड़ टेमघरपाडा येथील रिद्धीसिद्धी कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवार रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात इसमाने तळमजल्यावर उभ्या केलेल्या ४ दुचाकी जाळल्या आहेत.
भिवंडीत इमारतीखालील चार दुचाकी अज्ञाताने जाळल्या

भिवंडी : शहरातील कल्याणरोड़ टेमघरपाडा येथील रिद्धीसिद्धी कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवार रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात इसमाने तळमजल्यावर उभ्या केलेल्या ४ दुचाकी जाळल्या आहेत. या प्रकरणी शनिवारी दुपारी ३ वाजता शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुभाष बालकरण यादव यांनी फिर्याद दिली असून, या घटनेचा त्यास मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान अज्ञात इसमाने रिद्धीसिद्धी कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यावर रहिवाश्यांनी उभ्या केलेल्या चार दुचाकी गाड्यांवर आगसदृश किंवा स्फोटक पदार्थ टाकून त्या जाळण्यात आल्या. ही घटना समजताच रहिवाश्यांनी घरातील पाण्याने व पालिकेची अग्निशमन दल बोलावून हि आग विझविली; मात्र या आगीत दोन चाकी पूर्ण जाळल्या आहेत. या चार जळालेल्या दुचाकींची एकूण किंमत ५५ हजार रुपये आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in